Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! अखेर पिक विम्याचा GR आला

Crop Insurance: शेतकरी मित्रांनो पिक विमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. जवळपास आता सर्व जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झालेला आहे, व लवकरच पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होणार आहे. हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पिक विमा जमा झालेला आहे, या विषयाबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

पिक विमा मंजूर Crop Insurance Approved

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात एक नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. भरपूर दिवसापासून पिक विम्याची वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पिक विमा संदर्भात आता नवीन शासनाने जीआर काढलेला आहे. या जीआर मध्ये पिक विमा मंजूर केलेला आहे. लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये हा पिक विमा वाटप होणार आहे, व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना पिक विमा अनुदान तसेच पिक कर्ज तसेच इतर विविध सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच पिक विमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

पिक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

2022 पासून प्रलंबित असलेला पिक विमा व त्याची रक्कम यंदाच्या खरीप हंगामातील 2308 कोटी रुपये व 255 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे. तसेच खरीप 2024 मध्ये राज्यात विक्रमी 1 कोटी 71 लाख विमा अर्ज आले होते. त्यापैकी छाननी केल्यानंतर एक कोटी 65 लाख अर्ज हे ग्राह्य मान्यता आले आहेत. त्यापैकी केवळ 64 लाख अर्जदारांचे अर्ज ग्राह्य म्हणून पिक विमा लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

एवढ्या शेतकऱ्यांना मिळनार पिक विमा 

शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदानापोटी 2852 कोटी वितरण करण्यास मान्यता दिल्यानंतर पीक विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी मान्यता देखील दिलेले आहे. विमा कंपन्यांनी खरीप 2022 तसेच रब्बी 2022 व 23 मधील दोन कोटी 87 लाख खरीप 2023 मधील 181 कोटी तसेच 2023 24 च्या रब्बी हंगामातील 63 कोटी 14 लाख व यंदाच्या खरीप हंगामामध्ये 2308 कोटी अशी 255 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे सांगण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांना एक रुपयातील पिक विमा योजनेअंतर्गत 2024 या वर्षांमध्ये एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केले होते त्यातील फक्त काही अर्ज हे अपात्र ठरविले होते व उर्वरित शेतकऱ्यांना ग्राह्य धरले होते.

पिक विमा रक्कम निश्चित 

राज्यात राबविण्यात येणाऱ्या पिक विमा योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी ही समन्वय कंपनी आहे. या कंपनीने खरीप 2023 या वर्षासाठी तसेच रब्बी 2023 24 मधील विमा कंपन्याकडून राज्य शासना अपेक्षित परतावा रक्कम व खरीप 2023 मध्ये नाकारलेल्या अर्जाचा, विमा हप्ता रक्कम यांमधून 2023 साठी खरीप व रब्बी मधील राज्याचा वाट्याचा पिक विमा हिस्सा 2024 मधील उर्वरित अग्रीम हिस्ता व विमा अनुदान तसेच मागील खरीपातील उर्वरित राज्य वाट्याचा शेतकरी विमा हप्ता अनुदान रक्कम देण्याची विनंती केली होती. त्यानुसार 2023 मध्ये एक हजार 87 कोटी 7 लाख विमा रक्कम देणे अपेक्षित.

एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा 

राज्यात एक रुपयात पिक विमा योजना लागू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिक विमा अर्जाची संख्याही 97 लाखांवरून थेट एक कोटी 70 लाखांच्या आसपास गेली होती. यामध्ये बीड सह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार देखील झाले होते. त्यामुळे अर्जाची छाननी वारंवार करण्यात येत होती व एक कोटी 65 लाख अर्ज हे पात्र धरण्यात आले होते. परंतु त्यापैकी फक्त 64 लाख शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार आहे. त्यांचाच अर्ज ग्राह्य म्हणून धरण्यात आलेला आहे. 1 कोटी 1 लाख अर्जदारांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment