Gold Today Rates: लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. एक लाख रुपयांपर्यंत सोन्याचे दर गेले होते. सोन्याचे दर सतत वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु आता पुन्हा एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण की सोन्याच्या दरामध्ये आता पुन्हा घसरण झालेली पाहायला मिळत आहे. कोणत्या ठिकाणी सोन्याला कशाप्रकारे दर मिळत आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सोन्याच्या दरामध्ये आपल्याला आता घसरण झालेली दिसत आहे.
सोन्याचे सध्याचे दर (Gold Today Rates)
सध्या प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 96 हजार 300 रुपये दर चालू आहे. तसेच 22 कॅरेट सोन्यासाठी 89 हजार 600 रुपये एवढा दर चालू आहे. तसेच 14 कॅरेट सोन्यासाठी 62 हजार 600 रुपये दर चालू आहे. त्यानंतर सोन्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत आता समोर येत आहेत. परंतु सध्या सोन्याच्या दरात काही रुपयांनी घसरण झालेली दिसत आहे. परंतु पुढील काळात सोन्याचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.Gold Today Rates
सोन्याच्या दरामध्ये किती रुपयांनी घसरण
24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 600 रुपयांची घसरण झालेली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 600 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच 18 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 900 रुपयांची घसरन झालेली दिसत आहे. व 14 कॅरेट सोन्यासाठी 400 रुपयांची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील काळात आणखी किमती वाढतील की घसरण होईल यांकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.