Solar Panel Yojana: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामधील काही अशा महत्त्वाच्या योजना आहेत. त्यामधून पर्यावरणात देखील कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. अशा एका योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, त्या योजनेचे नाव आहे “सौर पॅनल योजना” या योजनेअंतर्गत नागरिकांना वीज बिलापासून देखील मुक्तता मिळते, व पर्यावरणाची देखील कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. नागरिकांना आता सरकारकडून 78 हजार रुपयांचा सौर पॅनल बसवण्यासाठी निधी मिळणार आहे. यासाठी कोणकोणते नागरिक अर्ज करू शकतात व कशाप्रकारे हा निधी मिळणार आहे पाहूया.
मित्रांनो तुम्ही एकदा सौर पॅनल सेटअप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 20 ते 25 वर्ष हा सौर पॅनल साठी खर्च करण्याची अजिबात गरज नाहीये. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लाईट बिल भरण्याची देखील आवश्यकता राहणार नाही. कारण की आपण सूर्याच्या मदतीने सौर पॅनलवरती ऊर्जा निर्माण करू शकतो, व ही स्वच्छ ऊर्जा आपले उपकरण चालवण्यासाठी वापरू शकतो. यासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करणार आहोत याबाबतची सविस्तर माहिती पाहणारच आहोत.
पात्रता व अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटी देण्यात आलेल्या आहेत. जसे की अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्या नागरिकाचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या जर दोन अटी तुमच्या पूर्ण असतील तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करून आपल्या घरावरती सौर पॅनल बसू शकतात व विनामूल्य वीज वापरू शकता.
आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो तुम्हाला देखील जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जसे की पॅनकार्ड, विज बिल, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचा तपशील, तुमचे फोटो तसेच आधार कार्ड ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. अन्यथा तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यास अडचण येऊ शकते.
सौर पॅनल वापर कसा करायचा (Solar Panel Use)
मित्रांनो सोलर पॅनल आल्यापासून भारतामध्ये आपल्याला मोठी उत्क्रांती घडून आल्याचे दिसत आहे. घरोघरी आता हळूहळू सोलर पॅनल बसविण्यात येत आहेत व सरकारकडून देखील या योजनेसाठी सबसिडी मिळत आहे. जेणेकरून सर्वत्र ठिकाणी सौर पॅनल बसावेत व स्वतःची स्वतःच निर्माण करावी यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. भारतामध्ये या योजनेची ऊर्जा क्षेत्रातील एक नव्या क्रांतीची नोंद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे मित्रांनो आता वीज टंचाईची जी समस्या होती ती देखील लवकरच दूर होणार आहे, व त्याच्यानंतर पर्यावरणाला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
नागरिक आता वाढत्या वीजबिलामुळे त्रस्त झालेले आहेत, त्यामुळे सरकारकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना सबसिडी दिली जात आहे. जेणेकरून कमी पैशांमध्ये नागरिक सौर पॅनल बसवू शकतील, व विज बिल पासून देखील बचावू शकतील. यासाठी सरकारकडून सूचना देण्यात येत आहे की नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा व आपल्या घरावर देखील सोलर पॅनल बसून घ्यावेत.
अर्ज करण्याची प्रोसेस
- सर्वांत अगोदर https://pmsuryaghar.gov.in/#/ या वेबसाइट वर जा
- Consumer वर क्लिक करून Apply वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व Capcha टाकून verify करा
- नंतर OTP टाकून लॉगिन करा
- त्यानंतर आपले नाव>इमेल आयडी>ऍड्रेस>राज्य>जिल्हा>तालुका>pin Code टाका verify करा
- त्यानंतर आपली जी संपूर्ण डिटेल आहे ती टाकून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Solar panel energy is very interesting yojana.