SSC And HSC Result: राज्यातील सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण की चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2024 25 मध्ये झालेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल आता लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल कधी लागणार आहेत. हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दहावी बारावीचे विद्यार्थी हे बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची ही आतुरता आता संपणार आहे. कारण की लवकरच दहावी व बारावीचे निकाल लागणार आहेत यासंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे.SSC And HSC Result
SSC And HSC Results
विद्यार्थी मित्रांनो 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील बारावीचे पेपर हे 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाले होते, व ते 18 मार्च 2025 रोजी संपले होते. तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर 21 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाले होते व ते 17 मार्च 2025 रोजी संपले होते. त्यामुळे बारावीचा निकाल अगोदर लागणार आहे, व दहावीचा निकाल काही दिवसांनी उशिरा लागणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची खूपच जास्त आतुरता आहे. त्यांची आतुरता ही आता समाप्त होणार आहे, व लवकरच निकाल देखील लागणार आहे.
10वी 12वी बोर्ड परीक्षा निकाल कधी लागणार.?
महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे बारावीचे निकाल हे 15 मे पर्यंत लागू शकतात. तसेच दहावीचे निकाल हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. असे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली. आधी बारावीचा निकाल लागेल व काही दिवसानंतर दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. 15 मे पर्यंत बारावीचे निकाल लागतील अशी माहिती बऱ्याच ठिकाणावरून समोर येत आहे.SSC And HSC Result
कसा पाहायचा निकाल?
विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी काही संकेत स्थळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्याच्या मदतीने विद्यार्थी सहजपणे आपल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन निकाल पाहू शकतात. mahresult.nic.in, mahahsscboard.in, msbshse.co.in hscresult.mkcl.org या संकेतस्थळावरती जाऊन विद्यार्थ्यांनी आपला सीट क्रमांक व आपल्या आईचे नाव टाकल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर निकाल समोर येईल.SSC And HSC Result