Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना आता 3 हजार रुपये मिळणार आहेत. ते 3 हजार रुपये कोणकोणत्या कामगारांना मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करायचा आहे की ऑफलाइन याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचा.
बांधकाम कामगार योजना पूर्ण माहिती
कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की मित्रांनो आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये कामगारांचे सर्वात मोठे योगदान असते. त्यामुळे कामगारांच्या भवितव्याचा देखील विचार करणे सरकारला आवश्यक असते. त्यामुळे सरकार बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते, व बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देखील देत असते. त्यामुळे राज्याचे बांधकाम कामगार हे प्रगतीपथावरती आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण हे देखील खूप महत्त्वाचे असते त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी देखील विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हे 3 हजार रुपये अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार हे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कना आहेत. बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कृषी मजूर, हातकाम कामगार, स्वयंरोजगार व्यक्ती, विक्रेते व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांचा यामध्ये समावेश होतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा यापासून वंचित न ठेवता त्यांना देखील विविध गोष्टींचा लाभ देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचे देखील भविष्य नक्कीच सुधारेल.
श्रम योगी मानधन योजना
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बांधकाम कामगारांचे खूप मोठे योगदान असते व ते योगदान देऊनही कामगारांना सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची आर्थिक सुरक्षा मिळत नव्हती तसेच त्यांच्या वृद्धपकाळामध्ये आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी देखील कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. त्या कारणामुळे बांधकाम कामगारांना श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना बांधकाम कामगारांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण की बांधकाम कामगारांना दर महिन्याला आता 3 हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. ही योजना 16 वर्षे ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा संघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी होणार आहे.
योजनेचे फायदे
ज्या नागरिकांकडे इ श्रम कार्ड आहे त्यांना मासिक 3 हजार रुपयांची पेन्शन मिळते. तसेच अपघात विमा, इश्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा कवर देखील मिळतो. तसेच कामगाराचा मृत्यू झाला तर कुटुंबाला 2 लाख रुपये देखील मिळतात. आरोग्य विमा मिळवण्यासाठी देखील या कार्डचा लाभ होतो. तसेच कौशल्य विकास व सरकारी योजना यासाठी देखील कार्डचा वापर केला जातो, व या योजनेच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.
योजनेसाठी पात्रता
- उमेदवाराचे वय हे सोळा वर्षे ते 59 वर्ष असणे गरजेचे आहे
- उमेदवार हा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा असावा
- उमेदवाराचे मासिक उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे
- उमेदवार हा आयकर दाता नसावा
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
- सर्वात अगोदर eshram.gov.in या वेबसाईटवर जा
- पृष्ठावरील “eShram” या पर्यायावर क्लिक करा
- आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाका
- मोबाईल वरती आलेला ओटीपी टाका
- त्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरून व्यवसाय बद्दल माहिती भरून कामाचे क्षेत्र व इतर तपशील त्या ठिकाणी भरा
- त्यानंतर स्वयंघोषणापत्र फॉर्म भरावा आणि सबमिट करा
- नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्ही इश्रम कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकता
- किंवा तुम्ही तुमच्या जवळील सीएससी केंद्र मध्ये जाऊन देखील ही प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडून करून घेऊ शकता